ग्रंथालय

अंतरंग ग्रंथालय

लोकसहभाग व मदतीने साकारलेल्या “अंतरंग ग्रंथालयात” चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, संगीत, उपयोजित कला, ललित कला, इतिहास, विज्ञान, अध्यात्म, मानसशास्त्र, धर्म, नीती, कायदा, इत्यादी अनेक विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत; ते हि विनामूल्य!

मुक्तसंवाद

मुक्तसंवाद

वर्षभरात “मुक्तसंवाद” ह्या शीर्षकाखाली विशीष्ट विषयात निपुण, अभ्यासक, समाजसेवक, उच्च अधिकारी यांना आमंत्रित केले जाते व त्यांच्यासोबत, त्यांच्या विषयाशी संबंधित संवाद साधला जातो. आतापर्यंत इतिहास अभ्यासक श्री. अप्पा परब, सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी झटणाऱ्या वीरमाता श्रीम. अनुराधा गोरे, दुर्ग अभ्यासक श्री. मिलिंद पराडकर, इतिहास संशोधक श्री. श्रीदत्त राऊत, इत्यादी दिग्गजांनी संवाद साधला आहे.

इंद्रधनू कला महोत्सव

इंद्रधनू

“इंद्रधनू कला महोत्सव” ह्या कार्यक्रमात आत्तापर्यंत चित्रकार वासुदेव कामथ, सुलेखनकार अच्युत पालव, शिल्पकार चंद्रजीत यादव, व्यंगचित्रकार विकास सबनीस, चित्रकार विश्वनाथ साबळे, वारली  चित्रकार सदाशिव जिव्या म्हशे, शिल्पकार मधुकर वंजारी, चित्रकार विजय सकपाळ, शिल्पकार संदीप राऊत, चित्रकर्ती चित्रगंधा वनगा – सुतार, चित्रकार किरण गोरवाला, इत्यादी अनेक जगप्रसिद्ध कलाकारांनी आपले मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर केले आहे.

इतर उपक्रम

इतर उपक्रम

  • कवी कट्टा
  • ज्येष्ठ कट्टा
  • उत्फूर्त जल्लोष (संगीत)
  • स्वररंग (संगीत)
  • वृक्षारोपण व वृक्षदिंडी
  • विशेष संगीत / नृत्य / नाट्य कार्यक्रम

अंतरंग चे ध्येय..

रसिक समाजाची निर्मिती

प्रत्येक व्यक्ती हि कलाकार जरी बनू शकली नाही, परंतु त्या प्रत्येकाला कलेचा आस्वाद घेता आला; तरी एका कलासक्त रसिक समाजाची निर्मिती होईल! हाच समाज आनंदी व नोकोप व्यवस्था निर्माण करू शकतो! “अंतरंग प्रतिष्ठान” ह्या रसिक समाजाच्या निर्मितीचा पाया रचते आहे.

पर्यावरण संवर्धन

उज्वल व सुदृढ भविष्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन असेच, मानवाकडून होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचे नियंत्रण हि आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे. “अंतरंग प्रतिष्ठान” पर्यावरण संगोपनाच्या कार्यासाठी सदैव प्रयत्नशील होती, आहे व राहील!

लोकसहभाग

असंख्य तरुण “अंतरंग प्रतिष्ठान” च्या समाज व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात हिरीरीने भाग घेत आहेत. आपल्या सारख्या सुज्ञ नागरिकांच्या मदतीनेच अनेक लोकोपयोगी कार्य “अंतरंग” यशस्वीपणे पार पडू शकत आहे. कृपया ह्या विधायक चळवळीत आपणही सहभागी होऊन, आपल्या पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्य निर्मितीत सहभागी व्हा!

देणगी

“अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे” हि ‘महाराष्ट्र शासन’ नोंदणीकृत संस्था आहे. (नोंदणी क्र. ई-९५२१/०१५, ठाणे)

आपण दिलेल्या देणगीतूनच अनेक यशस्वी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ह्या समाजकार्यासाठी व पर्यावरण संगोपनासाठी “अंतरंग” ला आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

 

BANK DETAILS:
A/c Name: ANTARANG SANSKRUTIK KALA DARPAN PRATISHTHAN
Bank: BANK OF BARODA
A/c No.: 490201 0000 4474
IFSC No.: BARB0SAPHAL

arms-bonding-closeness-1645634

आगामी उपक्रम

‘मुक्त संवाद’ with ‘अनघा मोडक’

posted on April 20, 2019

लॉकडाऊन चा “मुक्तसंवाद”

रोज  सायं. ०६:०० वा.

“अंतरंग” च्या facebook page ला.

लॉकडाऊन च्या नैराश्यात आपल्या आयुष्यात आनंदाचा आणि सकारात्मकतेचा किरण फुलवायला येत आहेत “नवा दिवस – नवा कलाकार” ह्या अभिनव संकल्पनेतू रोज संध्याकाळी ०६:०० वाजता फेसबुक ला प्रत्यक्ष संवाद !

 

रोज संध्याकाळी ०६:०० वाजता सर्वांनी आवर्जून पहावे आणि चर्चेत, संवादात सहभागी व्हावे!

मागील सर्व Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वृक्ष लागवड व संवर्धन

posted on January 12, 2019

आगामी काळात महाराष्ट्र शासनाच्या ‘सामाजिक वनीकरण’ ह्या उपक्रमात खारीचा वाटा म्हणून “अंतरंग प्रतिष्ठान” मागील काही वर्षांपासून सफाळे परिसरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्य करीत आहे. भविष्यात परिसरातील वृक्षमित्र व वृक्ष अभ्यासक यांच्या मदतीने दुर्मिळ व औषधी झाडांची बाग बनवता यावी ह्यासाठी “अंतरंग” प्रयत्नशील आहे.

एका संगीतकाराची मुशाफिरी..!

posted on February 01, 2020

मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने “मराठी भाषा दिवस” साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील “अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान” हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने मराठी संगीत क्ष्रेत्रातील अत्यंत नावाजलेले संगीतकार ज्यांचे मराठी अभिमान गीत आपल्या सगळ्यांच्याच ओठांवर आहे असे “श्री कौशल इनामदार” स्वतः सफाळ्यात येत आहेत.

‘जाई काजळ’ प्रायोजित “एका संगीतकाराची मुशाफिरी” हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम श्री कौशल इनामदार रविवार १ मार्च रोजी सायंकाळी ठीक ५ः३० ते ७ः३० या वेळेत सादर करतील. मुलाखतकार श्रीमती अस्मिता पांडे ह्या कौशल इनामदार यांची मुलाखत घेतील व श्रीमती राजेश्री गोरे त्यांना साथ देतील.

रसिक प्रेक्षकांसाठी संपूर्ण कार्यक्रम हा विनामूल्य असून, संपर्क करून नाव नोंदवावे ही विनंती. ८४४६५८७००२, ७०३०२६०७८८, ९०९६९४९७९८, ९२७२२८४१३३.