“अंतरंग” चे सभासद व्हा!

नमस्कार!

आपण “अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे” मागील ५ वर्षांपासून सफाळे आणि परिसरात कला, साहित्य, संगीत, संस्कृती, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांचेसातत्याने आयोजन करीत आलेलो आहोत.

आपला संस्थेचा उद्देशहा केवळ मनोरंजन नसून, विविध कार्यक्रमाद्वारे साहीत्य, कला, संस्कृती वपर्यावरण जोपासानेतून रसिक, आनंदी व समाधानी समाजाचे निर्माण करणे हा आहे!

त्याकरिता आपण वर्षभरात “मुक्तसंवाद, इंद्रधनू कला महोत्सव, ढोल-ताशेपथक, ज्येष्ठ कट्टा, कवी कट्टा, वृक्ष दिंडी, वृक्षारोपण, स्वर-रंग, दिवाळीपहाट, ग्रंथालय, अभ्यासिका, माहितीपट” इत्यादी अनेक यशस्वी कार्यक्रमवारंवार करीत असतो व करीत राहू.

हे सामाजिक, सांस्कृतिक वपर्यावरण पूरक कार्य अधिक वेगाने तसेच प्रभावीपणे होण्यासाठीआपल्यासारख्या सहकाऱ्यांची नेहमीच मदत होते. आपली अशीच साथ “अंतरंग” लाकायम मिळावी ह्याकरिता आपण सदस्यत्वघेऊन, संस्थेच्या आगामी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपले अधिकृत सहकार्य मिळावे हि विनंती.

वर्ष २०१९-२० (एप्रिल २०१९ ते मार्च २०२०) करिता सदस्यत्व घेण्यासाठीअंतरंग सदस्य फॉर्मउपलब्ध असून रविवार, दि. ५ मे २०१९ पर्यंत नोंदणीकरून वार्षिक सदस्यत्व शुल्क रु.,२००/- रोख / धनादेश / ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे अदा करावे ही विनंती. (ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यास ट्रांसिक्शन आयडीकळविणे)

ज्यांना एकत्रित रक्कम भरणे शक्य नसेल त्यांनीदरमहा/ त्रैमासिक/ सहामाही अश्या स्वरूपात रु.१००/प्रतिमहा प्रमाणे रोख अदाकरणे. (वय वर्षे १८ पेक्षा कमी असलेल्यांसाठी सभासदत्व शुल्क लागू नाही)

अंतरंग आयोजित करीत असलेले बहुतेक कार्यक्रम हे लोकवर्गणीतून होतअसल्यामुळे विनामूल्य/ निःशुल्क असतात. काही कार्यक्रम हे निधीउभारण्यासाठी सशुल्क असतात अश्या कार्यक्रमासाठी अंतरंग सदस्यांकडूनकोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. (सभासदांनी सशुल्क कार्यक्रमासाठी निधीमिळविणे अपेक्षित आहे)

नव्यानेच सभासद होणारे तसेच, सभासदत्वचे नूतनीकरण करणाऱ्या सर्वांनीच आपले एक पासपोर्ट आकाराचेछायाचित्र व आधार कार्ड (UID) ची छायांकित प्रत (झेरॉक्स) सोबत जोडणे.

सर्व इच्छुक सभासद, नोंदणीकृत तसेच नूतनीकरण करणाऱ्या सभासदांनी कृपयारविवार, दि. ५ मे २०१९ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता, “अंतरंग ग्रंथालय”, पोस्ट ऑफिस शेजारी, सफाळे पूर्व येथे स्वागत व ओळख-परिचयसाठी उपस्थितराहावे ही विनंती!

सभासद फॉर्म ऑनलाईन मिळविण्यासाठी कृपया येथे click करा अथवा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक माहितीकरिता संपर्क करा-

रवींद्र: 8888555836
यशवंत: 9096949798

अंतरंगच्या मागील कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी व अंतरंग ला प्रोत्साहनदेण्यासाठी कृपया आमच्या फेसबुक पेज ला भेट देऊन आपली पसंती (Like) नोंदवा.
https://www.facebook.com/antarangsaphale/