अंतरंग ग्रंथालय व अभ्यासिका

अंतरंग प्रतिष्ठान, सफाळे तर्फे सप्रेम नमस्कार..🙏
     अंतरंग प्रतिष्ठान तर्फे नव्यानेच सुरू केलेल्या “विनामूल्य ग्रंथालयाची” सुरुवात करताना हे फक्त ग्रंथालय ना राहता अभ्यासिका देखील व्हावी यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
     आतापर्यंत समाजातील वाचनप्रिय मंडळींकडून ग्रंथालयास ६०० च्या वर पुस्तके देणगी स्वरुपात प्राप्त झालेली आहेत. नामवंत लेखकांची, विविध विषयांवरची, कला, संगीत, अध्यात्म, सामान्यज्ञान, इत्यादी अनेक विषयांची काही दुर्मिळ पुस्तके देखील त्यात आहेत.
     परंतु, UPSC व MPSC करीता अशी अनेक पुस्तके आहेत; ज्यांचा खर्च गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही.
आम्ही आपल्याला विनंती करतो आहोत की UPSC व MPSC च्या अभ्यासाकरिता आपल्याकडून काही स्पर्धा-परीक्षा संदर्भातील पुस्तके आम्हाला मिळावी, जेणेकरून ती या विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देता येतील.. (इतर विषयाची, सुस्थितीत असलेली पुस्तके सुद्धा दान करावीत)
     आपले सहकार्य अशा मुला मुलींचे भविष्य घडवण्यासाठी निश्चित हातभार लावतील..
पुस्तके दान करून अथवा पुस्तकांसाठी पैशांस्वरूपात मदत करून आपणही ह्या कार्यात मोलाचा सहभाग द्यावा ही विनंती.🙏🏻
पत्ता :
अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान,
केळुस्कर चाळ, अद्वैत सोसायटीच्या मागे,
पोस्ट ऑफिस जवळ,
मु. पो. सफाळे, ता. जी. पालघर,
महाराष्ट्र. ४०११०२
संपर्क:
यशवंत भावसार: 09096949798
विशाल चंपानेरकर: 08446587002
BANK DETAILS:
Name: ANTARANG SANSKRUTIK KALA DARPAN PRATISHTHAN
Bank: BANK OF BARODA
A/c No.: 49020100004474
IFSC No.: BARB0SAPHAL