ध्येय व उद्दिष्ट

रसिक समाजाची निर्मिती

प्रत्येक व्यक्ती हि कलाकार जरी बनू शकली नाही, परंतु त्या प्रत्येकाला कलेचा आस्वाद घेता आला; तरी एका कलासक्त रसिक समाजाची निर्मिती होईल! हाच समाज आनंदी व नोकोप व्यवस्था निर्माण करू शकतो! “अंतरंग प्रतिष्ठान” ह्या रसिक समाजाच्या निर्मितीचा पाया रचते आहे.

लोकसहभाग

असंख्य तरुण “अंतरंग प्रतिष्ठान” च्या समाज व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात हिरीरीने भाग घेत आहेत. आपल्या सारख्या सुज्ञ नागरिकांच्या मदतीनेच अनेक लोकोपयोगी कार्य “अंतरंग” यशस्वीपणे पार पडू शकत आहे.

कृपया ह्या विधायक चळवळीत आपणही सहभागी होऊन, आपल्या पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्य निर्मितीत सहभागी व्हा!

मदत / देणगी

“अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे” हि ‘महाराष्ट्र शासन’ नोंदणीकृत संस्था आहे. (नोंदणी क्र. ई-९५२१/०१५, ठाणे)

आपण दिलेल्या देणगीतूनच अनेक यशस्वी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ह्या समाजकार्यासाठी व पर्यावरण संगोपनासाठी “अंतरंग” ला आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

BANK DETAILS:
A/c Name: ANTARANG SANSKRUTIK KALA DARPAN PRATISHTHAN
Bank: BANK OF BARODA
A/c No.: 490201 0000 4474
IFSC No.: BARB0SAPHAL

“अंतरंग” मध्ये सहभागी व्हा!

‘अंतरंग प्रतिष्ठान’ मध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद!

नमस्कार!

आपण “अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे” मागील ५ वर्षांपासून सफाळे आणि परिसरात ‘कला, साहित्य, संगीत, संस्कृती, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण’ विषयक विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करीत आलेलो आहोत.

आपला संस्थेचा उद्देश हा केवळ मनोरंजन नसून, विविध कार्यक्रमाद्वारे साहीत्य, कला, संस्कृती व पर्यावरण जोपासानेतून रसिक, आनंदी व समाधानी समाजाचे निर्माण करणे हा आहे!

त्याकरिता आपण वर्षभरात “मुक्तसंवाद, इंद्रधनू कला महोत्सव, ढोल-ताशे पथक, ज्येष्ठ कट्टा, कवी कट्टा, वृक्ष दिंडी, वृक्षारोपण, स्वर-रंग, दिवाळी पहाट, ग्रंथालय, अभ्यासिका, माहितीपट” इत्यादी अनेक यशस्वी कार्यक्रम वारंवार करीत असतो व करीत राहू.

हे सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण पूरक कार्य अधिक वेगाने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी आपल्यासारख्या सहकाऱ्यांची नेहमीच मदत होते. आपली अशीच साथ “अंतरंग” ला कायम मिळावी ह्याकरिता आपण सदस्यत्व घेऊन, संस्थेच्या आगामी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपले अधिकृत सहकार्य मिळावे हि विनंती.

वर्ष २०१९-२० (एप्रिल २०१९ ते मार्च २०२०) करिता सदस्यत्व घेण्यासाठी ‘अंतरंग सदस्य फॉर्म’ उपलब्ध असून रविवार, दि. ५ मे २०१९ पर्यंत नोंदणी करून वार्षिक सदस्यत्व व देणगी शुल्क रु.१,०००/- रोख / धनादेश / ऑनलाईन ट्रान्स्फर द्वारे अदा करावे ही विनंती. (ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यास ट्रांसिक्शन आयडी कळविणे)

BANK DETAILS:
A/c Name: ANTARANG SANSKRUTIK KALA DARPAN PRATISHTHAN
Bank: BANK OF BARODA
A/c No.: 490201 0000 4474
IFSC No.: BARB0SAPHAL

ज्यांना एकत्रित रक्कम भरणे शक्य नसेल त्यांनी दरमहा/ त्रैमासिक/ सहामाही अश्या स्वरूपात रु.१००/प्रतिमहा प्रमाणे रोख अदा करणे. (वय वर्षे १८ पेक्षा कमी असलेल्यांसाठी सभासदत्व शुल्क लागू नाही)

अंतरंग आयोजित करीत असलेले बहुतेक कार्यक्रम हे लोकवर्गणीतून होत असल्यामुळे विनामूल्य/ निःशुल्क असतात. काही कार्यक्रम हे निधी उभारण्यासाठी सशुल्क असतात अश्या कार्यक्रमासाठी अंतरंग सदस्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. (सभासदांनी सशुल्क कार्यक्रमासाठी निधी मिळविणे अपेक्षित आहे)

नव्यानेच सभासद होणारे तसेच, सभासदत्वचे नूतनीकरण करणाऱ्या सर्वांनीच आपले एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व आधार कार्ड (UID) ची छायांकित प्रत (झेरॉक्स) सोबत जोडणे.

सर्व इच्छुक सभासद, नोंदणीकृत तसेच नूतनीकरण करणाऱ्या सभासदांनी कृपया रविवार, दि. ५ मे २०१९ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता, “अंतरंग ग्रंथालय”, पोस्ट ऑफिस शेजारी, सफाळे पूर्व येथे स्वागत व ओळख-परिचयसाठी उपस्थित राहावे ही विनंती!

सभासद फॉर्म ऑनलाईन मिळविण्यासाठी कृपया http://www.antarang.org/ ह्या संकेतस्थळावर भेट द्यावी अथवा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक माहितीकरिता संपर्क करा-

रवींद्र: 8888555836
यशवंत: 9096949798

अंतरंगच्या मागील कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी व अंतरंग ला प्रोत्साहन देण्यासाठी कृपया आमच्या फेसबुक पेज ला भेट देऊन आपली पसंती (Like) नोंदवा.
https://www.facebook.com/antarangsaphale/

 

 

०५

वर्षे आपल्या सेवेची

५०+

सभासद

१०+

वार्षिक उपक्रम

५०००+

लाभार्थी

लाभलेले दिग्गज कलाकार

समाजसेवक व अभ्यासक

समाजसेवक व तज्ञ

अंतरंग आयोजित विविध कार्यक्रमात कॅप्टन अनुराधा गोरे, गड किल्ले अभ्यासक श्री. श्रीदत्त राऊत, इतिहासकार डॉ. मिलिंद पराडकर, शिवाजी महाराजांच्या संस्कृतीचा अभ्यास करणारे श्री. अप्पा परब, पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील, पोलीस अधीक्षिका सौ. शारदा राऊत, इत्यादी अनेक तज्ञांनी मार्गदर्शन आहे.

दृश्य कला

चित्र, शिल्प, इत्यादी कला प्रकार

जगप्रसिद्ध चित्रकार व सुलेखनकार यांनी आपले प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले आहे ज्यात प्रामुख्याने सुलेखनकार श्री. अच्युत पालव, चित्रकार श्री. वासुदेव कामथ, व्यंगचित्रकार श्री. विकास सबनीस, चित्रकार श्री. विश्वनाथ साबळे, चित्रकार श्री. विजय सकपाळ, चित्रकार श्री. विजय बोंदर, चित्रकर्ती सौ. चित्रगंधा वनगा-सुतार, शिल्पकार श्री. चंद्रजीत यादव, शिल्पकार श्री. मधुकर वंजारी, शिल्पकार श्री. संदीप राऊत, वारली चित्रकार श्री. किरण गोरवाला व श्री. सदाशिव म्हसे, नखचीत्रकार श्री. किरण जगताप, चित्रकार श्री. किशोर नादावडेकर, व्यंगचित्रकार श्री. प्रशांत कुलकर्णी, चित्रकर्ती समृद्धा पुरेकर, चित्रकार श्री. विशाल सुतार, टेक्स्टाईल डिझायनर कु. जिज्ञासा दवणे, टेक्स्टाईल डिझायनर श्री. प्रदीप भुते  शिल्पकार श्री. प्रसन्न गोगीलवार, शिल्पकार श्री. योगेश लोखंडे, कुंभारकाम श्री. नितीन केणी, कुंभारकाम सौ. प्रीती किणी, कुंभारकाम श्री. अजयसिंह भदोरिया, कुंभारकाम श्री. धम्मानंद (नंदू) पाटील, कुंभारकाम श्री. राहुल धिवरे व देवेंद्र बर्डे, रंगावलीकार श्री. प्रशांत सुवर्णा व उमेश पांचाळ, सुलेखनकार श्री. नितीन वरे, फोटोग्राफी श्री. उदय कावळे, अनिमेशन श्री. अमित दीक्षित, इत्यादी दिग्गजांनी अंतरंगच्या कार्यक्रमात आपले प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिले आहे.

श्राव्य व सादरीकरण कला

संगीत, नृत्य, नाट्य

विविध कार्यक्रमांतून संगीतकार श्री. कौशल इनामदार, दिग्दर्शक श्री. संदीप राऊत व निर्माती सौ. नीरजा पटवर्धन, कवी व गीतकार श्री. स्वप्नील चाफेकर, तबला वादक श्री. शेखर गांधी, सितारवादक श्री. सारंग वेचलेकर, बासरीवादक मानुराज राजापूत, तबला वादक श्री. प्रवीण परदेशी, चित्रकार व कवी श्री. आशुतोष आपटे, तबलावादक श्री. शेखर पाटील, तबलावादक श्री. राहुल चंपानेकर, साक्सोफोन वादक श्री. भूषण पाटील, “जादूची पेटी” कार्यक्रम हार्मोनियम वादक श्री. आदित्य ओक व सत्यजित प्रभू, प्रसाद पाध्ये, शास्त्रीय गायन श्री. भूपेंद्र जगताप, शास्त्रीय गायिका कु. प्राजक्ता शेंद्रे, बासरीवादक श्री. भगवान भावसार, बासरीवादक श्री. कुणाल तरे, कथ्थक नृत्यांगना कु. श्रुती पटवर्धन व कल्याणी तीभे, लावणी सम्राज्ञी अक्षय मालवणकर आणि सहकारी,  शिटी वादक श्री. उदय शिरूर, इत्यादी कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.